Moshi : किल्ल्याची स्वच्छता आणि व्याख्यानातून शिवजयंती साजरी

एमपीसी न्यूज – मोशी येथील संतनगर मित्र मंडळाच्या वतीने रायरेश्वर किल्ल्यावर सफाई अभियान राबविण्यात आले. तसेच शिव व्याख्यानाचे आयोजन करत आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांची पालखीतून मिरवणूक काढून शिवजयंती साजरी करण्यात आली.

उद्योगपती जगन्नाथ माने, कर्नल तानाजी अरबुज, माजी सैनिक अंकुश जाधव, उद्योजिका शोभा फटांगडे, प्रा. रामदास चपटे, संतनगर मित्र मंडळ, भूगोल फाउंडेशन, संतनगर मित्र मंडळ युवा प्रतिष्ठाण, इंद्रायणी सेवा संघ, संतनगर महिला मंडळ आदी मंडळांचे सर्व सदस्य उपस्थित होते.

19 फेब्रुवारी रोजी संतनगर मित्र मंडळाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची संबळ हे पारंपरिक वाद्य वाजवून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर शिवाजी महाराजांची मूर्ती पालखीत ठेवण्यात आली. सुवासिनींनी शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे औक्षण केले. यश विश्वास समुद्रे या बाल व्याख्यात्याने शिवाजी महाराजांचा जीवनपट शिवप्रेमींसमोर उलगडून ठेवला.

मंडाळाचे अध्यक्ष विठ्ठल वाळुंज पाटील यांनी शिवाजी महाराजांना अभिप्रेत असणा-या निसर्ग आणि गडकिल्ल्यांचे संवर्धन करून शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याची योजना आखली होती. त्यानुसार 16 फेब्रुवारी रोजी रायरेश्वर किल्ल्यावर सफाई अभियान राबवण्यात आले. पुढील पिढीला शिवाजी महाराजांचे आचार आणि विचार आपल्या कृतीतून दिसायला हवे, या अट्टाहासाने हा उपक्रम राबविण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराजांचे रयतेवरील प्रेम, महिलांविषयीचा आदर, समान न्यायाची वागणूक, चुकीच्या प्रवृत्तींना होणारे कठोर शासन, मावळ्यांना महाराजांबद्दल वाटणारा आदर, निसर्ग संवर्धनासाठीचे कार्य याबाबत शिवजयंतीच्या निमित्ताने उहापोह करण्यात आला. तनिष्का जगदाळे यांनी राजमाता जिजाऊ आणि प्राची जाधव यांनी येसूबाई यांच्या वेशभूषा कार्यक्रमाचे आकर्षण ठरल्या. सुशील आहेर, मनोज साबळे आणि वेशभूषा केलेल्या दोन्ही मुलींचा यावेळी सत्कार करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.