Moshi : सलूनमधील कारागिराचा मोबाईल पळवला

एमपीसी न्यूज : –  सलून दुकानात काम करत असताना कारागिराच्या खिशातून मोबाईल फोन चोरीला गेला. ही घटना रविवारी (दि. 26) सायंकाळी साडेचार वाजता मोशी प्राधिकरणातील स्पाईन सिटी मॉलमध्ये(Moshi) घडली.
प्रथमेश प्रदीप गायकवाड (वय 22, रा. आळंदी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गायकवाड हे सलून दुकानात काम करतात. रविवारी ते कामावर असताना अज्ञात व्यक्तीने गायकवाड यांच्या शर्टच्या खिशातून 10 हजार रुपये किमतीचा मोबाईल फोन(Moshi) चोरून नेला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

Total
0
Shares
Related Posts
Total
0
Share