Moshi : पादचारी महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज- रस्त्याने पायी चाललेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी हिसकावले. ही घटना मोशी येथे घडली.

जागृती अमोल कुडे (वय 30, रा. बोऱ्हाडेवाडी, मोशी) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दुचाकीवरील तीन चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जागृती या मंगळवारी सायंकाळी पायी चालल्या होत्या. त्या बोऱ्होडीवाडी येथील ग्लोबल सेरिनिटी सोसायटीच्या प्रवेशद्वारासमोर आल्या असता दुचाकीवरून तीन चोरटे आले. त्यांनी जागृती यांच्या गळ्यातील साडेबारा ग्रॅम वजनाचे 40 हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र हिसकावून नेले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंटे याबाबत अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.