Moshi : ‘संपूर्ण जीवन मुक्ती’चे आमिष दाखवून अम्मा भक्तांची फसवणूक

एमपीसी न्यूज – संपूर्ण जीवन मुक्तीसाठी कलकी आर्मीमध्ये सहभागी होण्यासाठी कार्डांचे वाटप करून अम्मा भगवान भक्तांची तथाकथित अम्मा भक्तांनी फसवणूक केली. हा प्रकार 2005 ते ऑक्टोबर 2018 या कालावधीत मोशी येथे घडला.

याप्रकरणी 55 वर्षीय महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार निवेदना उर्फ माधवी (वय 44, रा. कोंढवा), अस्मिता अनिल राव (वय 34, रा. डांगे चौक, वाकड), पी राधादेवी उर्फ विशिष्ठा (वय 42, रा. डांगे चौक, वाकड), अर्चना हारगुडे (वय 38, रा. वाघोली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला 2005 पासून अम्मा भगवान यांच्या भक्त आहेत. तेंव्हापासून फिर्यादी यांनी आरोपी महिलांना अम्मा भगवान यांचे वैयक्तिक दर्शन, आश्रमात हवन, नवग्रह हवन, अन्नदान करण्यासाठी रोख स्वरूपात पैसे दिले आहेत. ऑक्टोबर 2018 मध्ये सर्व आरोपी महिला फिर्यादी यांच्या घरी आल्या त्यांनी सांगितले की, संपूर्ण जीवन मुक्तीसाठी कलकी आर्मीमध्ये 64 हजार लोकांची निवड करण्यात येणार आहे. त्यासाठी लाखो कार्डाचे वाटप करण्यात येत आहे. प्रत्येक कार्डाची किंमत 500 रुपये आहे.

यावर विश्वास ठेवून फिर्यादी यांनी एक कार्ड घेतले. त्यावर आरोपींनी केवळ नाव, मोबाईल नंबर आणि सिरीयल नंबर लिहिला आहे. त्या कार्डवर कोणत्याही ट्रस्टचे नाव अथवा रक्कम लिहिली नसल्याने फिर्यादी यांना त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. त्यांनी त्यांच्या ओळखीच्या काही महिलांकडे चौकशी केली असता त्यांच्या ओळखीच्या आणखी आठ महिलांची देखील आरोपी महिलांना अशाच प्रकारे फसवणूक केली असल्याचे समजले. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.