Moshi: बाथरूमला जाते असे सांगून गेलेल्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार

Moshi: Complaint of kidnapping of a minor girl who went to the bathroom फिर्यादी महिलेची सोळा वर्षांची मुलगी बाथरूमला जाते असे सांगून घराच्या दरवाज्याला बाहेरून कडी लावून बाहेर पडली.

एमपीसी न्यूज- बाथरूमला जाते असे सांगून घराबाहेर गेलेल्या अल्पवयीन मुलीला घरासमोरून फूस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. ही घटना सोमवारी (दि.13) सांयकाळी चारच्या सुमारास आदर्शनगर, मोशी येथे घडली.

याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेची सोळा वर्षांची मुलगी बाथरूमला जाते असे सांगून घराच्या दरवाज्याला बाहेरून कडी लावून बाहेर पडली. यावेळी एका अज्ञात व्यक्तीने या मुलीला घरासमोरून फूस लावून पळवून नेले आहे. भोसरी एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.