Moshi : हॅन्डब्रेक न लावलेला कंटेनर रिव्हर्स आल्याने त्या खाली चिरडून तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज – निष्काळजीपणे हॅन्ड ब्रेक न लावता कार ( Moshi ) कंटेनर रस्त्याच्या कडेला पार्क केले होते. मात्र हा कंटेनर रिव्हर्स येवून त्याखाली चिरडून एका 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. हा धक्कादायक प्रकार मोशीतील क्रांती चौक येथे गुरुवारी (दि.18) घडला आहे.
याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलिसांनी कंटेनर चालक सुबोध नारायण शिरोळे (वय 53 रा.मोशी) याला अटक केली आहे. तर विकास नानाभाऊ सोनवणे (वय 35 रा.नेहरुनगर, पिंपरी) अये मयत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सुर्यकांत नानाभाऊ सोनावणे यांनी फिर्याद दिली आहे.
MPC News Special : उपमुख्यमंत्र्यांचे सुतोवाच अन पोलीस महासंचालक शहरात दाखल
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास सोनावणे हे चहा पिऊन पायी जात असताना त्यांच्या अंगावर हा कार कंटेनर (एन.एल.01 के 2051) हा रिव्हर्स आला. काही कळण्याच्या आत सोनावणे यांना धडक लागली व ते खाली पडले. त्यांच्या डोक्यावरून कंटेनरचे मागचे चाक गेले यात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
आरोपी शिरोळे याने त्याच्या ताब्यातील कंटेनर हे हॅन्डब्रेक न लावताच निष्काळजीपणे रस्त्याच्या कडेला पार्क केले होते. त्यामुळे कंटेनर अचानक रिव्हर्स गेला ज्यात सोनावणे यांना आपला जिव गमवावा लागला. पोलिसांनी चालकाला अटक केली असून एमआयडीसी भोसरी पोलीस पुढील तपास करत ( Moshi )आहेत.