Moshi : जागेच्या वादातून चुलत भावाला कोयत्याने मारहाण

एमपीसी न्यूज – जागेच्या वादातून दोन चुलत भावांमध्ये वाद झाला. यामध्ये एकाने त्याच्या दोन साथीदारांसह चुलत भावावर कोयत्याने वार करत लाकडी दांडक्याने मारहाण केली. यामध्ये चुलत भाऊ गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी (दि. 28) दुपारी चारच्या सुमारास देहू रस्ता मोशी येथे घडली.

_MPC_DIR_MPU_II

शशिकांत रमाकांत बोराटे (वय 32, रा. देहूरस्ता मोशी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दीपक प्रकाश बोराडे आणि त्याच्या दोन साथीदार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शशिकांत आणि दीपक यांच्यामध्ये जागेवरून वाद सुरू होता. रविवारी दुपारी चारच्या सुमारास दीपक याने त्याच्या दोन साथीदारांसह शशिकांत यांच्यावर हल्ला केला. दीपक याने लोखंडी कोयता आणि लाकडी दांडक्याने शशिकांत यांना मारहाण केली. यामध्ये शशिकांत गंभीर जखमी झाले. यावरून गुन्हा दाखल केला असून एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.