Moshi : क्लासला जाणाऱ्या मुलीचा पाठलाग करणा-या मुलावर गुन्हा

एमपीसी न्यूज – क्लासला जाणाऱ्या मुलीचा पाठलाग करणा-या अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि. 20) रात्री नऊच्या सुमारास मोशी येथे घडला.

याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, 15 वर्षीय मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मुलाने फिर्यादी यांची मुलगी क्लासवरून घरी येत असताना तिचा पाठलाग केला. तसेच, रस्त्यात अडवून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून शेवटी मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.