Moshi: तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी तरुणावर गुन्हा

Moshi: Crime against a young man in connection with the suicide of a young woman आरोपीने फिर्यादीच्या मुलीला लग्नाचे अमिष दाखवले. तिच्यासोबत मंदिरात लग्न देखील केले.

एमपीसी न्यूज- एका तरुणीसोबत मंदिरात लग्न केले असतानाही तरुणाने दुसऱ्या मुलीसोबत साखरपुडा केला. त्यानंतर मंदिरात लग्न केलेल्या तरुणीला नकार दिला. हा धक्का सहन न झाल्याने तरुणीने गळफास लावून आत्महत्या केली. याबाबत तरुणावर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

किरण पांडुरंग पवार (रा. शळद, ता. बाळापूर, जि. अकोला) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आत्महत्या केलेल्या तरुणीच्या आईने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना मागील दोन वर्षांपासून 9 जून 2020 पर्यंत घडली आहे. फिर्यादीचे कुटुंब मूळचे अकोला जिल्ह्यातील आहे.

_MPC_DIR_MPU_II

ते कामानिमित्त बोऱ्हाडेवाडी मोशी येथे राहतात. दरम्यान आरोपीने फिर्यादीच्या मुलीला लग्नाचे अमिष दाखवले. तिच्यासोबत मंदिरात लग्न देखील केले.

लग्न झालेले असताना आरोपीने स्वतःचे दुसरे लग्न ठरवले. दुसऱ्या मुलीसोबत साखरपुडा केला. त्यानंतर आरोपीने फिर्यादी यांच्या मुलीसोबत लग्नाला नकार दिला.

हा धक्का सहन न झाल्याने फिर्यादीच्या मुलीने 9 जून रोजी बोऱ्हाडेवाडी मोशी येथील घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.