Moshi : विनयभंगप्रकरणी तरुणावर गुन्हा

एमपीसी न्यूज – महिलेच्या जागेत बेकायदेशीररित्या प्रवेश करीत तिचा विनयभंग केला. ही घटना बोराडेवाडी, मोशी येथे बुधवारी सकाळी घडली.

तुषार संभाजी बोराडे (वय 25, रा. बोराडेवाडी, मोशी) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत 41 वर्षीय महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास आरोपी बोराडे याने फिर्यादी यांच्या जागेत बेकायदेशीररित्या प्रवेश केला. तसेच फिर्यादी महिलेला शिवीगाळ करीत तिचा विनयभंग केला.

याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी तरुणाला अदयाप अटक केलेली नाही. सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.