Moshi crime: अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – पालिकेने नोटीस देऊनही त्यांनी अनधिकृत बांधकाम हटवले नसल्यामुळे महापालिकेकडून दोघांवर गुन्हे दाखल केले आहेत.

कैझर ताहिरभाई टिनवाला (रा. खडीमशीन रोड, मोशी) आणि भास्कर भागवत तुकाराम (रा. खडीमशीन रोड, मोशी) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिकेचे उपअभियंता हेमंत प्रभाकर देसाई (वय 47) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी कैझर आणि तुकाराम यांनी 11 जून 2010 पासून 24 नोव्हेंबर 2020 या कालावधीत बांधकाम करताना महापालिकेचा कोणताही परवाना घेतला नाही. महापालिकेने दिलेल्या नोटीसची अंमलबजावणी केली नाही. अनधिकृत बांधकाम काढून टाकणे बंधनकारक असतानाही ते बांधकाम काढले नाही. याबाबत कैझर आणि तुकाराम यांच्या विरोधात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.