Moshi Crime : घरफोडी करून चार कॅमेरा लेन्स पळवल्या

एमपीसी न्यूज – अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करून कॅम-याच्या लेन्स चोरून नेल्या. ही घटना 26 सप्टेंबर रोजी देहू-आळंदी रस्ता मोशी येथे उघडकीस आली.

लुकेश गणेशराव धनगावकर (वय 35, रा. देहू-आळंदी रस्ता, मोशी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी धनगावकर 25 सप्टेंबर रोजी रात्री सव्वासात वाजता त्यांच्या पत्नीला आणण्यासाठी सांगली येथे गेले होते. त्यांचे घर कुलूप लाऊन बंद होते. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडीकोयंडा तोडून घरात प्रवेश केला.

घरातून 35 हजारांच्या निकॉन कंपनीच्या तीन कॅमेरा लेन्स, एक टॅमेरॉन कंपनीची लेन्स आणि सहा ग्राम वजनाची सोन्याची अंगठी असा एकूण 60 हजारांचा ऐवज चोरून नेला. 26 सप्टेंबर रोजी सकाळी साडेआठ वाजता फिर्यादी घरी आले असता हा प्रकार उघडकीस आला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.