Moshi Crime News: कत्तलीसाठी नेल्या जाणा-या 22 जनावरांची सुटका; दोघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – मोशी येथील बाजार समितीमधून 22 जनावरे कत्तलीसाठी नेली जात असताना सामाजिक कार्यकर्ते आणि पोलिसांनी छापा टाकला. त्यात 22 जनावरांची सुटका करून दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नितीन वामन मोहिते (वय 25, रा. बोराटेवाडी, मोशी), साबीर कुरेशी (रा. पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत शिवशंकर राजेंद्र स्वामी (वय 27, रा. शिवाजीनगर, पुणे) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधून गाय, बैल, वासरे, रेडकू अशी लहान मोठी जनावरे कत्तलीसाठी नेली जाणार असल्याची माहिती फिर्यादी स्वामी यांना मिळाली.

त्यानुसार स्वामी यांनी एमआयडीसी भोसरी पोलिसांना माहिती देत पोलिसांच्या मदतीने कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणा-यांचा कट उधळला. यात 22 जनावरांची सुटका करण्यात आली आहे. एमआयडीसी भासोरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.