Moshi Crime News : तरुणाला बेदम मारहाण; तिघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पत्नीसोबत फोनवर बोलत असलेल्या तरुणाला तिघांनी मिळून लोखंडी गज आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. ही घटना 27 ऑक्टोबर रोजी रात्री सव्वादहा वाजता न्यू राजधानी बेकरी, देहूरस्ता मोशी येथे घडली.

अयाज कमलउद्दीन अन्सारी (वय 28, रा. मोशी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याबाबत त्यांनी मंगळवारी (दि. 3) एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी अजीमुद्दिन निजामुद्दीन अन्सारी (रा. गांधीनगर, पिंपरी), मोहम्मद अस्लम अन्सारी (रा. कुदळवाडी, चिखली) आणि अन्य एकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अयाज हे 27 ऑक्टोबर रोजी रात्री सव्वादहा वाजता त्यांच्या पत्नीसोबत फोनवर बोलत न्यू राजधानी बेकरी, देहूरस्ता मोशी येथे थांबले होते. त्यावेळी आरोपी तिघेजण तिथे आले. त्यांनी फिर्यादी यांना लोखंडी गज आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली.

यामध्ये फिर्यादियांच्या हाताला, खांद्याला, तोंडाला, पाठीला दुखापत झाली. तसेच या मारहाणीत फिर्यादी यांचा एक दात पडून जबड्याला दुखापत झाली आहे.

एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.