Moshi : जुन्या भांडणाच्या कारणावरून एकाला लाकडी दांडक्याने मारहाण; सहा जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाच्या कारणावरून सहा जणांनी मिळून एकाला खो-याच्या लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. 7) सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास लक्ष्मीनगर मोशी येथे घडली. याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रवींद्र शांताराम महाजन (रा. बिजलीनगर, चिंचवड), आणि त्याचे पाच साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी, उत्तम बाबुराव शिनगारे (वय 41, रा. लक्ष्मीनगर, मोशी) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी उत्तम आणि आरोपी रवींद्र हे एकाच कंपनीत काम करतात. मागील काही दिवसांपूर्वी त्यांचे भांडण झाले होते. त्या भांडणाच्या रागातून रवींद्र याने गुरुवारी सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास उत्तम यांना फोन करून घराबाहेर बोलावून घेतले. उत्तम घराबाहेर आले असता आरोपी रवींद्र आणि त्याच्या इतर पाच साथीदारांनी मिळून खो-याच्या लाकडी दांडक्याने मारहाण केली. यामध्ये उत्तम यांचा हात फ्रॅक्चर झाला. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.