Moshi Crime News : विवाहितेच्या छळ प्रकरणी पती, सासू आणि दिरावर गुन्हा

एमपीसी न्यूज – घरकाम येत नाही. रंगाने काळी आहे तसेच मुलगाच हवा, अशी मागणी करत सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला. तसेच माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली. याबाबत पती, सासू आणि दिराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पती योगेश देवदत्त कुलकर्णी (वय 29), सासू विजया देवदत्त कुलकर्णी (वय 55), दीर अजिंक्य देवदत्त कुलकर्णी (वय 27, सर्व रा. बो-हाडेवाडी, मोशी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत पीडित विवाहितेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार फेब्रुवारी 2020 ते 18 ऑक्टोबर 2020 या कालावधीत बो-हाडेवाडी, मोशी येथे घडला. विवाहितेला स्वयंपाक करता येत नाही. घरकाम करता येत नाही. त्या रंगाने काळ्या आहेत, असे सासरच्या लोकांचे म्हणणे आहे.

आरोपींनी विवाहितेच्या बचत खात्यातील पैसे घेतले. तिला मुलगाच झाला पाहिजे, तसेच दिराला फ्लॅट घेण्यासाठी माहेरच्या लोकांकडून पाच लाख रुपये घेऊन येण्याची मागणी केली. आरोपींनी विवाहितेला वेळोवेळी शिवीगाळ करून हाताने मारहाण करत तिचा छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.