शनिवार, ऑगस्ट 20, 2022

Moshi Crime News : वाराणसी येथे पोहोच करण्यासाठी नेलेल्या वाहनाचा अपहार

एमपीसी न्यूज – मोशी ( Moshi) येथून वाराणसी ( Varanashi)  येथे पोहोच करण्यासाठी नेलेले वाहन 14 दिवसानंतरही वाराणसी येथे पोहोचवले नाही. त्या वाहनाचा चालकाने अपहार (Embezzlement of vehicle)  केला असल्याची फिर्याद एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे.

राजभानसिंग चौधरी (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अभिषेक दिलीपसिंग मोहिते (वय 38, रा.कृष्णानगर, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मोहिते यांनी आरोपी चौधरी याला टाटा झेनॉन योद्धा ही 7 लाख 83 हजार 907 रुपये किमतीची गाडी वाराणसी येथे पोहोच करण्यासाठी दिली.

चौधरी 14 जानेवारी रोजी दुपारी चार वाजता मोशी येथून निघाला. मात्र 14 दिवस उलटले तरी तो वाराणसी येथील पत्त्यावर पोहोचला नाही. त्याने पोहोच करण्यासाठी दिलेल्या गाडीचा अपहार केल्याचा संशय आल्याने मोहिते यांनी याबाबत फिर्यादी दिली आहे.

एमआयडीसी भोसरी पोलीस ( Midc Bhosari Police)  तपास करीत आहेत.

spot_img
Latest news
Related news