Moshi crime News : माहेरहून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ; घटस्फोटापूर्वीच केले दुसरे लग्न

एमपीसी न्यूज – माहेरहून पैसे आणावेत असा तगादा लावत सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ ( Harassment Of Maaried Women) केला. तसेच पहिल्या पत्नीशी (पीडित विवाहिता) घटस्फोट( Divorce)  घेण्यापूर्वीच पतीने दुसरे लग्नही ( Second Marrage)  केले असल्याबाबत पीडित विवाहितेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात ( Midc Bhosari Police station) फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती, सासू आणि सासरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नितीन मोहन सोनवणे (वय 39, रा. मोशी), जयश्री मोहन सोनवणे (वय 65), मोहन गणपत सोनवणे (वय 70, दोघे रा. मल्हार पेठ, सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत 36 वर्षीय पीडित विवाहितेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार सन 2010 पासून 29 ऑक्टोबर 2020 या कालावधीत सातारा आणि मोशी येथे घडला आहे. या कालावधीत आरोपींनी विवाहितेकडे माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली. त्यासाठी विवाहितेने नकार दिला. त्यावरून विवाहितेला मारहाण करून वारंवार मानसिक व शारीरिक त्रास देऊन क्रूर वागणूक दिली.

फिर्यादी विवाहिता आणि आरोपी पती नितीन यांचा कायदेशीर घटस्फोट झालेला नाही. असे असताना नितीन याने दुसरा विवाह केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.