Moshi crime News :गरोदर महिलेचा विनयभंग करणाऱ्या तरुणाला अटक

एमपीसी न्यूज – प्रेमसंबंध असल्याचे सांगत गरोदर महिलेसोबत गैरवर्तन करणा-या एका तरुणाला एमआयडीसी भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. सुदर्शन चंद्रकांत संकपाळ (वय 26, रा. मोशी प्राधिकरण) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.

हा प्रकार बुधवारी (दि. 20) दुपारी दोन वाजताच्या सुमारास मोशी प्राधिकरण येथील एका सोसायटीमध्ये घडला. याबाबत पीडित गरोदर महिलेने पोलिसात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला तिच्या घरी दुपारच्या वेळी जेवणाचा डबा आणण्यासाठी गेली. त्यावेळी आरोपी बेकायदेशीरपणे तिच्या घरात आला. महिलेचा हात धरून तिच्यावर प्रेम असल्याचे सांगत त्याने गैरवर्तन केले. याबाबत पीडित महिलेने पोलिसात धाव घेत फिर्याद दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.