Moshi Crime News : बेकायदेशीरपणे गुटखा वाहतूक करणा-या एकाला अटक; सात लाखाचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज – बेकायदेशीरपणे गुटखा वाहतूक करणा-या एकाला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट एकच्या पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून गुटखा आणि टेम्पो असा एकूण 6 लाख 97 हजार 840 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि. 3) दुपारी एक वाजताच्या सुमारास मोशी येथील वेशीजवळ करण्यात आली.

आशिष अनिल शहा (वय 24, रा. मोशी गावठाण, ता. हवेली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस नाईक अमित आनंदराव खानविलकर यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्यात गुटखा व पान मसाला आणि तत्सम पदार्थ विक्री, साठा, वाहतूक करण्यास प्रतिबंध आहे. आरोपी आशिष शहा बोलेरो पीकअप (एम एच 12 / के पी 1597) मधून गुटखा विक्रीसाठी जात होता. पोलिसांनी त्याला मोशी वेशीजवळ अडवून ताब्यात घेतले. त्याच्याकडून गुटखा आणि टेम्पो असा एकूण 6 लाख 97 हजार 840 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक पांचाळ तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.