Moshi Crime News : दोन मुली झाल्याने विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज – विवाहितेला दोन मुली झाल्या या कारणावरून सासरच्या मंडळींनी तिचा छळ केला. तसेच फ्लॅटचे कर्ज फेडण्यासाठी आणि मोठ्या मुलीच्या हॉस्पिटलच्या खर्चासाठी माहेरहून लाखो रुपये आणण्याची मागणी केली.

हा प्रकार मे 2014 ते 29 डिसेंबर 2020 या कालावधीत बोर्‍हाडेवाडी, मोशी आणि संभाजीनगर, निगडी येथे घडला.

पीडित विवाहितेने याबाबत एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती, सासू आणि नणंदेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विवाहितेला दोन मुली झाल्या मात्र सासरच्यांना मुलगा हवा असल्याने सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला.

मोशी येथील फ्लॅटचे कर्ज फेडण्यासाठी तसेच मोठ्या मुलीच्या हॉस्पिटलच्या खर्चासाठी माहेरहून दोन लाख रुपये आणण्याची मागणी केली. पैसे आणण्यासाठी विवाहितेकडे वारंवार तगादा लावला. त्यावरून वाद घालून शिवीगाळ व लाथाबुक्क्यांनी मारहाण करत विवाहितेचा छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.