Moshi crime News : घराबाहेर शतपावली करणाऱ्या महिलेचा विनयभंग; एकाला अटक

एमपीसी न्यूज – रात्री जेवणानंतर घराबाहेर शतपावली करत असलेल्या महिलेचा एकाने विनयभंग केला. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या महिलेच्या पतीला विनयभंग करणा-या व्यक्तीने आणि त्याच्या साथीदाराने गज दाखवून शिवीगाळ करत मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. 1) रात्री साडेदहा वाजता घडली.

विष्णू डेरे (वय 40) याला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यासह बाबासाहेब देसाई (वय 42, रा. नागेश्वरनगर, मोशी) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत 24 वर्षीय महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास फिर्यादी महिला घराबाहेर शतपावली करत होत्या. त्यावेळी आरोपी विष्णू तिथे आला. त्याने ‘ तू खूप सुंदर दिसते’ असे म्हणत फिर्यादी महिलेसोबत गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला.

या प्रकरणाचा जाब विचारण्यासाठी महिलेचे पती गेले. त्यावेळी दोन्ही आरोपींनी त्यांना लोखंडी गज दाखवून शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. पोलिसांनी विष्णू डेरे याला अटक केली आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.