Moshi : इस्त्रीच्या कपड्यांचे पैसे देण्याच्या बहाण्याने तरुणीचा विनयभंग

एमपीसी न्यूज – इस्त्रीचे कपडे देण्याच्या बहाण्याने घरात घुसून एका नराधमाने तरुणीशी अश्लील कृत्य करून तिचा विनयभंग केला. हा प्रकार मोशी येथे रविवारी (दि. 21) सकाळी साडेनऊच्या सुमारास घडला.

याप्रकरणी तरुणीच्या आईने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार जयवंत ज्ञानेश्वर जगदाळे (रा. मोशी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास जयवंत याने इस्त्री केलेल्या कपड्यांचे पैसे देण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश केला. त्यावेळी फिर्यादी महिलेची मुलगी घरामध्ये एकटीच होती. याचा गैरफायदा घेत जयवंत याने तरुणीशी अश्लील चाळे केले. घटनेनंतर त्याने लगेच घरातून पळ काढला. काही वेळेनंतर तरुणीची आई घरी आली असता तिने घडलेला प्रसंग आईला सांगितलं. यावरून आईने तात्काळ एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलीस उपनिरीक्षक ईश्वर जगदाळे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.