Moshi crime News : अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे; जाब विचारणाऱ्या पीडितेच्या वडिलांना मारहाण

एमपीसी न्यूज – अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे केल्याचा जाब पीडित मुलीच्या वडिलांनी विचारला असता दोघांनी मिळून त्यांना सिमेंटच्या गट्टूने मारहाण केली. त्यात मुलीचे वडील जखमी झाले. याबाबत मारहाण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि. 11) दुपारी बोराटेवस्ती, मोशी येथे घडली.

आशिष रामचंद्र गालफाडे, प्रभू गालफाडे (दोघे रा. बोराटेवस्ती, मोशी) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पीडित मुलीच्या 42 वर्षीय वडिलांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. 12) फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी आरोपी आशिष याचे वडील रामचंद्र गालफाडे यांच्याकडून घर विकत घेतले आहे. त्या कारणावरून आशिष याने फिर्यादी यांच्या 16 वर्षीय मुलीसोबत अश्लील चाळे करून तिचा विनयभंग केला.

याबाबत फिर्यादी यांनी आशिष याला जाब विचारला असता आशिष आणि प्रभू या दोघांनी मिळून फिर्यादी आणि त्यांच्या मुलींना शिवीगाळ करून हाताने मारहाण केली. आरोपींना समजावून सांगत असताना दोघांनी मिळून सिमेंटचा गट्टू डोक्यात मारून फिर्यादी यांना जखमी केले.

एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.