Moshi Crime News : लैंगिक अत्याचार प्रकरणी एकास अटक

एमपीसी न्यूज – लग्नाचे अमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी एका तरुणास अटक करण्यात आली आहे. ही घटना ऑगस्ट 2020 ते 11 डिसेंबर 2020 या कालावधीत बोऱ्हाडेवाडी, मोशी येथे घडली.

राहूल बबन भालेराव (वय 29, रा. सध्या रा. भीमा कोरेगाव, ता. शिरूर, जि. पुणे. मूळगाव मु. पो. पावसा, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पीडित महिलेने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भालेराव याने फिर्यादी तरुणीला लग्नाचे अमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याने ती गर्भवती राहिली. याप्रकरणी आरोपी भालेराव याला अटक केली आहे.

पोलीस उपनिरीक्षक जे. एस. गिरणार याबाबत अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.