-MPC-TOP-MOST-BANNER-I

Moshi Crime News : मोशीतील टायर दुकानातून टायर, स्टेफनी चोरीला

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – टायरच्या दुकानाचा पत्रा उचकटून दुकानातील टायर, स्टेफनी इतर साहित्य चोरून नेले आहे. 22 ते 25 मे दरम्यान खडी मशीन रोड, मोशी याठिकाणी ही चोरीची घटना घडली.

राजेश फुलचंद यादव (वय 30, रा. आदर्शनगर, मोशी, मुळगाव बिहार ) यांनी सोमवारी (दि.31) भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे टायरचे दुकान कुलूप लावून बंद होते. त्यावेळी अज्ञात चोरट्याने दुकानाचा पत्रा उचकटून दुकानातील टायर, स्टेफनी इतर साहित्य, असा 72 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला आहे.

पोलीस उपनिरीक्षक पुजारी अधिक तपास करत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.