Moshi Crime News : गोठ्यातून दोन गीर वासरांची चोरी

एमपीसी न्यूज – गीर गायीच्या दोन वासरांना गोठ्यामधून चोरट्यांनी चोरून नेले. संतनगर चौक, मोशी येथे शनिवारी (दि. 13) सकाळी सहाच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.

अनुपकुमार पोपट भोईटे (वय 30, रा. इंद्रायणी नगर, भोसरी) यांनी या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. 15) फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची 30 हजार रुपये किमतीची दोन गीर गायीची वासरे त्यांच्या गोठ्यात बांधली होती. शनिवारी पहाटे अडीच ते सहा या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी गोठ्यातून गीर गायीचे दोन वासरे चोरून नेली.

एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.