Moshi Crime News : कंपनीत पोहोच करण्यासाठी दिलेला सव्वादोन लाखांचा माल भंगारात विकला

टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – एका कंपनीतून दुस-या कंपनीत पोहोच करण्यासाठी दिलेला दोन लाख 20 हजार 50 रुपये किमतीचा माल टेम्पो चालकाने चक्क भंगारात विकला. हा प्रकार बुधवारी (दि. 18) दुपारी मोशी येथील एशिया स्क्रॅप दुकानात घडला.

श्रीमंत दिलीप गोसावी (वय 25, रा. खराबवाडी) असे आरोपी टेम्पो चालकाचे नाव आहे. त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संतोष बिरनजी पात्रा (वय 29, रा. तळवडे) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी चाकण येथील राणे एक्सल कंपनीत पोहोच करण्यासाठी आरोपीच्या टेम्पोत (एम एच 04 / ई वाय 1567) दोन लाख 20 हजार 50 रुपये किमतीच्या लोखंडी धातूच्या 90 प्रेसींग प्लेट्स दिल्या.

टेम्पो चालक आरोपीने टेम्पोमधील सर्व माल कंपनीत पोहोच न करता थेट भंगाराच्या दुकानात खाली केला. याबाबत त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.