Moshi Crime : रिक्षा टेम्पोतून भरदिवसा पावणे दोन लाखांचे साहित्य चोरीला

एमपीसी न्यूज – रिक्षा टेम्पोतून जॉबचे पार्सल घेऊन जात असताना मोशी टोलनाक्याजवळ चालक नाष्टा करण्यासाठी थांबला. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी रिक्षा टेम्पोतून एक लाख 89 हजार 258 रुपयांचे जॉब पार्सल चोरून नेले.

सुग्रीव बापूराव कोटंबे (वय 45, रा. काळेवाडी, पिंपरी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सुग्रीव यांच्याकडे रिक्षा टेम्पो (एम. एच. 14 / सी पी 7582) आहे. त्यावर भारत वाकोडे हे चालक म्हणून काम करतात. 5 सप्टेंबर रोजी सकाळी एमआयडीसी भोसरी येथून ते त्यांच्या रिक्षा टेम्पोत रॉकर आर्म या जॉबचे पार्सल चाकण येथील एका कंपनीत घेऊन जात होते.

मोशी टोलनाक्याजवळ चालक भारत दुपारी बारा वाजताच्या सुमारास नाष्टा करण्यासाठी थांबले. त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या रिक्षा टेम्पोमधून एक लाख 89 हजार 258 रुपये किमतीचे जॉब पार्सल चोरून नेले. याबाबत 22 सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.