Moshi crime : गोळ्या घालण्याची भाषा करत दहशत पसरवणारा तडीपार भाई गजाआड

एमपीसी न्यूज : गोळ्या घालण्याची भाषा करत परिसरात मीच इथला भाई आहेत म्हणत दहशत पसरवणाऱ्या तडीपार सराईताला 24 तासाच्या पोलिसांनी गजाआड केले आहे.(Moshi crime) हा प्रकार मंगळवारी (दि.4) मध्यरात्री मोशी येथील नागेश्वर मंदिरा जवळ घडला.

चंदन सुरेंद्र सिंग (वय 35 रा.थेरगाव) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी गुंडा विरोधी पथकाचे पोलीस हवालदार विजय तुकाराम गंभिरे यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Chakan crime : परवानगी शिवाय परिसरात काम केले म्हणून शिवगाळ करत मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याला 23 नोव्हेंबर 2021 रोजी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ दोन यांनी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले होते. तरीही त्याने आदेशाचा भंग करत मंगळवारी आरोपी मोशी परिसरात आला.(Moshi crime) त्याच्याकडे एक देशी बनावटीची लोखंडी पिस्टल व 2 जिवंत काडतुसे होती. शस्त्रासह परिसरात फिरत मीच आहे पिंपरी-चिंचवडचा भाई चंदनसिंग, मला कोणी डिवचले तर एकएकाला गोळ्या घालून मारून टाकेन.माझ्या नादाला लागून नका म्हणून मोठमोठ्य़ाने ओरडत परिसरात दहशत पसरवत होता. पोलिसांना खबर मिळताच गुंडा विरोधी पथकाने त्याला शस्त्रासह अटक केली. एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्ह दाखल करण्यात आला असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.