Moshi: आंतरराष्ट्रीय प्रशिक्षण केंद्र ‘पीपीपी’ तत्वावर विकसित करा; पालकमंत्र्यांची सूचना

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाला मोशी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रदर्शन केंद्र उभे करणे शक्य होणार नाही. त्यासाठी प्राधिकरणाकडे तेवढे पैसे देखील नसतील. त्याची देखभाल करणे कठिण होईल. त्यासाठी मोशीतील आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रदर्शन केंद्र पल्बिक प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) तत्वावर विकसित करण्याची सूचना पालकमंकत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. प्राधिकरणाने कुस्ती प्रशिक्षण केंद्र विकसित करावे, असेही ते म्हणाले.

पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण (पीसीएनटीडीए) कामकाजाचा आढावा आज (शुक्रवारी) पालकमंत्री पाटील यांनी घेतला. प्राधिकरणाचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकार सहकार्य करेल. प्राधिकरणाचे किती प्रश्न प्रलंबित आहेत ते सांगा. शक्य तेवढे प्रश्न दोन महिन्यात मार्गी लावले जातील. त्यासाठी एक अधिका-याची नेमणूक केली जाईल. प्राधिकरण प्रशासनाच्या मुंबई वा-या टळतील. वेळेची बचत होईल.

  • प्राधिकरण हद्दीतील सर्वांगीण विकास करण्यासाठी स्वायत्ता संस्थाच्या अधिका-यांना प्राधिकरणाच्या समितीवर घेण्यात यावे. जिल्हाधिकारी समितीवर आहेत. परंतु, पुण्याचे विभागीय आयुक्त, पीएमआरडीएचे आयुक्त, महापालिका आयुक्त नाहीत. त्यांना प्राधिकरणावर सदस्य म्हणून घेण्यात यावे. त्यासाठी आवश्यक असल्यास कायद्यात बदल करण्यात यावा, असेही पाटील यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.