Moshi : पत्नीला मारहाण केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा

एमपीसी न्यूज – कामावर जाण्यासाठी निघालेल्या पत्नीला कामावर जाऊ नको सांगत तिला मारहाण केली. याबाबत पत्नीने पती विरोधात पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. ही घटना मंगळवारी (दि. 12) सकाळी साडेनऊच्या सुमारास लक्ष्मीनगर मोशी येथे घडली.

अनिल चंद्रकांत वाघ (वय 37, रा. लक्ष्मीनगर, मोशी) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. तर रेश्मा अनिल वाघ (वय 28) यांनी याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रेश्मा मंगळवारी सकाळी कामावर जाण्यासाठी निघाल्या. त्यावेळी अनिल यांनी रेश्मा यांना ‘तू कामावर जाऊ नको’ असे म्हणत शिवीगाळ केली. हाताने व लाकडी दांडक्याने रेश्मा यांना मारहाण केली. यामध्ये रेश्मा यांच्या दोन्ही हातावर मुका मार लागला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.