Moshi : ‘एमपीएससी’ची परीक्षा देऊन नोकरी करण्यासाठी सासरच्यांकडून छळ; विवाहितेची आत्महत्या

एमपीसी न्यूज – ‘एमपीएससी’ची परीक्षा देऊन नोकरी करावी, असा सासरच्यांनी विवाहितेकडे हट्ट केला. त्यावरून व घरगुती अन्य कारणांवरून सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला. या छळाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याचा गुन्हा भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 30) दुपारी बाराच्या सुमारास मोशी येथे घडली.

सायली सुनील कदम (वय 22) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी विवाहितेच्या 50 वर्षीय आईने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, पती सुनील रामलिंग कदम, सासरे रामलिंग कदम, सासू आदिका कदम, दीर सचिन कदम, सतीश कदम (सर रा. सिद्धेश्वर नगर, देहूरस्ता मोशी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत सायली यांच्या माहेरच्या लोकांची जमीन सासरच्या मंडळींच्या नावावर करून द्यावी, अशी मागणी आरोपींनी केली. तसेच सायली यांच्या लग्नात त्यांच्या माहेरच्या लोकांनी फ्रीज, टीव्ही अशा वस्तू दिल्या नसल्याच्या रागातून सासरच्या लोकांनी त्यांचा छळ केला. सायली यांनी ‘एमपीएससी’ची परीक्षा देऊन काम करावे अशा अनेक कारणांवरून त्यांचा शारीरिक व मानसिक छळ केला.

सासरच्या त्रासाला कंटाळून त्यांनी बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास सायली यांनी राहत्या घरात साडीच्या साहाय्याने फॅनला गळफास लावून आत्महत्या केली. असे सायली यांच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी सासरे रामलिंग कदम याला अटक केली आहे. भोसरी एमआयडीसी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.