Moshi: माहेराहून फ्रिज, एलईडी आणण्यासाठी आयटी अभियंत्याकडून पत्नीचा छळ

एमपीसी न्यूज – माहेराहून पैसे, फ्रिज, एलईडी टीव्ही आणावे, म्हणून आयटी अभियंत्याने आपल्या पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याची घटना मोशी, प्राधिकरणात उघडकीस आली आहे. याप्रकरणी भोसरी, एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

याप्रकरणी 22 वर्षीय विवाहितेने पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रसाद किसन वांढेकर (वय 28 , रा. सेक्टर 4, संतनगर, मोशी प्राधिकरण) असे गुन्हा दाखल झालेल्या आयटी अभियंत्याचे नाव आहे.

  • याबाबत सहाय्यक फौजदार बाबासाहेब केदार यांनी सांगितले की, आरोपी प्रसाद आणि त्याचे सेवानिवृत्त शिक्षक वडील किसन वांढेकर हे दोघेच संतनगर येथील घरी राहतात. दोनच वर्षांपूर्वी फिर्यादी पिडीत विवाहीता आणि आरोपी प्रसाद यांचे लग्न झाले आहे. लग्नानंतर दोनच महिन्यापासून प्रसादने पिडीत विवाहीतेचा छळ करण्यास सुरूवात केली.

फिर्यादीच्या चारीत्र्यावर संशय घेऊन तसेच माहेराहून पैसे, फ्रिज, एलईडी टीव्ही आणावे, म्हणून तिला शिवीगाळ करत मारहाण केली. त्याचप्रमाणे रात्रभर जागे ठेवून विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. याचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.