Moshi :मूलबाळ होत नसल्याने विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज – मूलबाळ होत नसल्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ करण्यात आला. ही घटना गंधर्वनगरी, मोशी येथे घडली.

याबाबत 26 वर्षीय विवाहितेने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

याप्रकरणी प्रशांत दिलीप ढोले (वय 30), शांता दिलीप ढोले (वय 48), दिलीप किसन ढोले (वय 55), दत्ता दिलीप ढोले, महादेव बाळासाहेब ढोले, नीलम महादेव ढोले, इंदुमती बाळासाहेब भोसले, लक्ष्मी बाळासाहेब ढोले (सर्व रा. मोरगाव, ता. बारामती), संगिता संजय ढोले (रा. भोसरी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2 जानेवारी 2013 ते 10 एप्रिल 2015 या कालावधीत आरोपींनी आपआपसांत संगनमत करून फिर्यादी विवाहिता यांना मूल-बाळ होत नाही या कारणावरून तिचा छळ केला. तसेच फिर्यादी यांच्याशी घटस्फोट झालेला नाही, हे माहिती असूनही आरोपींनी पतीचा दुसरा विवाह करण्यास मदत केली. पोलीस उपनिरीक्षक डेरे याबाबत अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.