Moshi : दुकानाच्या जागा मालकीणीवर चोरीचा गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – बनावट चावीने दुकान उघडून दुकानातून इमिटेशन ज्वेलरीचे साहित्य चोरून नेले. तसेच दुकानाला दुसरे कुलूप लावले. याप्रकरणी दुकानाच्या जागा मालकीणीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

क्रांती शरद पवार (वय 32, रा. स्पाईन सिटी चौकाजवळ, प्राधिकरण, मोशी) यांनी रविवारी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मनिषा राजेंद्र शेळके (रा. देवळाली कॅम्प, नाशिक) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपी महिलेचे नाव आहे. ही घटना मार्च 2019 ते 20 फेब्रुवारी 2020 या कालावधीत प्राधिकरण, मोशी येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी क्रांती पवार यांचे स्पाईन सिटी चौकात अरिहंत इमिटेशन ज्वेलरीचे दुकान आहे. हे दुकान बंद असताना संशयित महिला आरोपी शेळके यांनी बनावट चावीने दुकान उघडून आतील इमिटेशन ज्वेलरी चोरून नेली. तसेच दुकानाला दुसरे कुलूप लावले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.