Moshi: पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीवर गुन्हा

एमपीसी न्यूज – पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने राहत्या घरी घळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीविरोधात भोसरी एमआयीडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हर्षदा सत्यजित लंकेश्वर (वय 24) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.

याप्रकरणी हर्षदाचा पती सत्यजीत विजय लंकेश्‍वर (वय 30 रा. संतनगर टेल्को कॉलनी, मोशी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत हर्षदाचे वडील राजाराम महादेव जगताप (वय 56, रा. नवी सांगवी) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी हर्षदा आणि सत्यजीत यांचा 3 मे 2018 रोजी विवाह झाला होता. लग्नात वडिलांकडून काही आणले नाही यावरुन हर्षदाचा शारिरीक व मानसिक छळ केला तसेच मारहाण केली. पतीच्या होणा-या त्रासाला कंटाळून हर्षदा हिने शुक्रवारी (दि.15) आत्महत्या केली, असे पोलिसांनी सांगितले. एमआयडीसी भोसरी याचा तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.