Moshi Fire News : आरटीओ कार्यालयातील दोन बसला आग

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) दोन बसला आग लागली. यात दोन्ही बस जळून खाक झाल्या. ही घटना आज (शुक्रवारी, दि. 5) दुपारी घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड आरटीओ कार्यालय परिसरात जप्त केलेली वाहने लावण्यात आली आहेत. त्यातील दोन बस गाड्यांना आज सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

अग्निशमन विभागाला घटनेची माहिती मिळताच तीन बंब तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. काही वेळेत आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. मात्र या घटनेत दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.