Moshi News : गुटखा साठवणूक प्रकरणी तरुणाला मोशी येथून अटक

एमपीसी न्यूज गुटखा साठवल्या प्रकरणी पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. (Moshi News) ही करवाई पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा एकच्या पथकाने शुक्रवारी (दि.2) मोशी टोलनाका येथे केली आहे.

विरेंद्र रामसुमेर कुमार (वय24 रा.मोशी) असे अटक आरोपीचे नाव असून त्याला एमआयडीसी भोसरी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस नाईक प्रमोद सुखदेव हिरळकार यांनी फिर्याद दिली आहे.

PCMC News : शहरातील 96 टक्के खड्डे बुजविले, आता केवळ 269 खड्डे; प्रशासनाचा दावा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्यांच्या पानटपरी मध्ये 7 हजार 350 रुपयांचा गुटखा व तंबाखूजन्य पदार्थ बेकायदेशीररित्या साठवून ठेवले होते. (Moshi News) यावरून एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.