Moshi : मोशीत सुसाट्याच्या वाऱ्यानं होर्डिंग कोसळलं, सुदैवाने जिवीतहानी नाही

एमपीसी न्यूज-मोशी येथे रस्त्याच्या कडेला असणारे लोखंडी होर्डिंग (Moshi)कोसळले आहे. मुंबईच्या घाटकोपर येथील होर्डिंग पडल्याची घटना ताजी असतांनाच पिंपरी चिंचवाडच्या मोशी येथे हि घटना घडली आहे.

मोशी येथे दुपारी साडेचारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह शहरातील काही भागात पाऊस झाला त्यात सोसाट्याचा वारा आल्याने हे होर्डिंग कोसळलं आहे.

Pune: अॅड.अभय छाजेड यांची ओरिसात निरीक्षकपदी नेमणूक

सुदैवाने यात कुणीही जखमी नाही ,जीविहितहानी झालेली नाही. मोशीतील(Moshi) वादळी वाऱ्याने जय गणेश साम्राज्य चौक येथील रस्त्यालगत असलेले भले मोठे लोखंडी होर्डिंग कोसळले आहे. यात चार दुचाकी आणि टेम्पोच नुकसान झाले आहे. होर्डिंग रस्त्यावर कोसळले नसल्याने वाहतुकीला कुठलीही अडचण निर्माण झाली नाही.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.