Moshi: ‘किसान’ कृषी प्रदर्शनाला आजपासून सुरुवात

एमपीसी न्यूज – भारतातील सर्वात मोठे कृषी प्रदर्शन “किसन”ला आजपासून सुरुवात झाली. मोशीत सकाळी प्रदशनाचे उद्घाटन झाले. 11 ते 15 डिसेंबर दरम्यान हे प्रदर्शन पुणे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन व संमेलन केंद्र, मोशी, भोसरीजवळ, पुणे येथे भरविण्यात आले आहे.

दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील प्रदर्शनाला भेट देणाऱ्या शेतक-यांमधल्या पहिल्या गटाच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. यामध्ये आंध्र प्रदेश,श्रीकाकुलम जिल्ह्यातील, सी.एच.आर. प्रसाद, उस्मानाबाद जिल्हा वाशी तालुक्यातील बाळासाहेब भंडावले, जालना जिल्हा अंबड तालुका येथील नारायण देशमुख आणि सुभाष बोराडे, नितीन बोराडे, पांडुरंग बोराडे, हणमंत बोराडे, बबन बोराडे, नारायण अप्पा बोराडे हे मोशी वरून व कागल तालुका कोल्हापूर जिल्ह्यामधून अभिजित गंगाधरे, संभाजी पाटील, कुमार पवार, अशोक पाटील, प्रल्हाद पाटील, युवराज पाटील, भरत देवडकर, मेघराज पाटील, अण्णासो पाटील यांचा समावेश होता.

15 एकर प्रदर्शन क्षेत्रावर 600 हून अधिक कंपन्या, संशोधन संस्था, नवउद्योजक शेतीतील नवीन तंत्रज्ञान व उत्पादने सादर करतील. प्रदर्शनात, 5 दिवसांमध्ये देशभरातून सुमारे 2 लाखाहून अधिक शेतकरी भेट देतील असा अंदाज आहे. आधुनिक तंत्रज्ञान व नवे विचार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे हे किसान प्रदर्शनाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

किसान प्रदर्शनाला कृषी मंत्रालय, भारत सरकार आणि कृषी विभाग, महाराष्ट्र राज्य यांचे सहकार्य लाभले आहे. शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आकाशवाणी चा माध्यम साथीदार म्हणून सहयोग लाभला आहे प्रायोजक आहेत. इंडिया पोस्ट पेमेन्ट्स बैंक हि अधिकृत बँक म्हणून सहभागी होत आहे.

यंदा किसान प्रदर्शनात संरक्षित शेती, पाणी नियोजन, कृषी निविष्ठा, यंत्रसामुग्री, पशुधन, जैव, ऊर्जा, वाटिका व शेती लघु उद्योग अशी विभागवार दालने उभी करण्यात आलेली आहेत. प्रत्येक दालनात त्या विशिष्ठ विभागातील स्टॉल शेतकऱ्यांना पाहायला मिळतील. शेतीसाठी लागणारी यंत्रे व उपकरणांचे प्रदर्शन खुल्या जागेत केले आहे.

पाण्याचे नियोजन व सिंचनासाठी लागणारे तंत्रज्ञान उपलब्ध करून देणाऱ्या 100 हून अधिक कंपन्यांचा सहभाग हे किसान प्रदर्शनातील मुख्य आकर्षण असेल. भारतीय कृषी अनुसंधान परिषद व त्यांच्या संशोधन संस्थाचाही कृषी प्रदर्शनात सहभाग असणार आहे.

मोबाईलचा वाढता वापर आणि डिजीटल इंडिया उपक्रमांमुळे शेतकऱ्यांशी संवाद साधणे सहज शक्य झाले आहे. यामुळेच उद्योजक नवनवीन सेवा व उत्पादने शेतकऱ्यांसमोर मांडण्यास उत्सुक आहेत. हे उद्योजक प्रामुख्याने बाजारभाव, जलव्यवस्थापन, शेतमालाचे मूल्यवर्धन, जैवतंत्र या क्षेत्रात नवीन संकल्पना घेऊन येत आहेत. या प्रदर्शनात शेतकरी कृषी क्षेत्रात येऊ घातलेले नवीन तंत्रज्ञान व त्यामुळे निर्माण होणाऱ्या संधींची माहिती घेऊ शकतील.

आंतरराष्ट्रीय दालनात चीन, ब्रिटन व कोरियामधील कंपन्यांचा सहभाग आहे. मुख्यत्वे छोटी यंत्रे व अवजारे या ठिकाणी प्रदर्शित होत आहेत. भारतीय शेतकऱ्यांच्या गरजा व बाजारपेठ जाणून घेणे; भारतात विक्री प्रतिनिधी नेमणे, हा या कंपन्यांचा उद्देश आहे. हे दालन प्रदर्शनाचे पहिले ३ दिवस म्हणजे 11 ते 13 डिसेंबर खुले असेल.

प्रदर्शन प्रवेशासाठी नावनोंदणी शुल्क 100 रुपये आहे. पूर्वनावनोंदणीची सुविधा kisan.net या संकेतस्थळावर व kisan.net मोबाईल अॅपवर उपलब्ध आहे. या सुविधेचा वापर केल्यास प्रदर्शन स्थळी येणाऱ्या शेतकऱ्यांचा वेळ वाचेल. पूर्वनोंदणी करणाऱ्यांना प्रवेश शुल्कात 50 रुपये सवलत मिळणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.