Moshi: ‘वेस्ट टू एनर्जी’ अंतर्गतचे प्रकल्प तातडीने पूर्ण करा

महापौर, आयुक्तांनी मोशीतील कचरा डेपोची केली पाहणी

एमपीसी न्यूज – मोशी कचरा डेपोतील ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पांतर्गत प्लास्टिकपासून इंधन निर्मिती, पेव्हिंग ब्लॉक, प्लास्टिकपासून ग्रॅन्युअल (प्लास्टिकचे दाणे )असे प्रकल्प तातडीने पूर्ण करावेत, अशा सूचना महापौर राहुल जाधव यांनी अधिका-यांना दिल्या.

मोशीतील नव्याने होणा-या एक हजार टन क्षमतेच्या रिकव्हरी फॅसेलिटी (एमआरफ)च्या प्रकल्पाची व प्लास्टिकपासून इंधन निर्मितीची महापौर जाधव, आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी पाहणी केली. स्थापत्य पर्यावरण विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कुलकर्णी, एस.एस.एन.इन्फ्रा कंपनीचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. हे प्रकल्प निवडणुकीपूर्वी पुर्ण करण्याच्या सूचना अधिका-यांना दिल्या आहेत. महापौरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. तसेच प्लास्टिकपासून ग्रॅन्युअल (प्लास्टिकचे दाने)फ्लेवर ब्लॉक बनविणे. बांधमाच्या राडारोड्यावर प्रक्रिया करणा-या प्लॉंटची पाहणी केली.

दरम्यान, कचरा डेपोसाठी सुमारे 81 एकर जागा 1991 पासून महापालिकेच्या ताब्यात आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातून सध्यस्थितीला मोशी कचरा डेपोवर प्रतिदिन सुमारे 850 मेट्रिक टन कचरा येत आहे. ठेकेदार व महापालिकेच्या यंत्रणेद्वारे कचरा संकलन करून डेपोपर्यंत नेला जातो. यात घरोघरच्या कच-यासह हॉटेल, कंपन्या, त्यातील कॅंटीन, गटारे आदी ठिकाणी निर्माण होणा-या कच-याचा समावेश आहे. कच-याचे वाढते प्रमाण व पूर्ण क्षमतेने भरत आलेला डेपो यातून मार्ग काढण्यासाठी कच-याचे वर्गीकरण करून त्यावर वेगवेगळ्या पद्धतीने प्रक्रिया केली जात आहे. यात प्लॅस्टिकपासून इंधन, पेव्हिंग ब्लॉक, सेंद्रिय खत, गांडूळ खतनिर्मितीचे असे प्रकल्प कार्यान्वयीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.