Moshi : मेडिकल दुकान फोडून 39 हजारांचा माल चोरीला

Medical shop was burglarized and goods worth Rs 39,000 were stolen

एमपीसी न्यूज – मेडिकल दुकान फोडून अज्ञात चोरट्यांनी चॉकलेट, डियो, परफ्युम, हेअर ऑइल आणि रोख रक्कम असा 39 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना बुधवारी (दि. 27) सकाळी आठ वाजता शिव रस्ता, मोशी येथे उघडकीस आली.

संध्या यतीन देशमुख (वय 30, रा. दिघी रोड, भोसरी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी देशमुख यांचे शिव रस्ता मोशी येथे कुमार प्रिन्सवाले सोसायटीत इंद्रायणी मेडिकल शॉप आहे. मंगळवारी (दि. 26) रात्री दहा वाजता मेडिकल दुकान बंद केले.

बुधवारी सकाळी दुकान असलेल्या सोसायटी मधील सुरक्षा रक्षकाचा फोन आला. सुरक्षा रक्षकाचे मेडिकल दुकानाचे शटर उचकटल्याचे सांगितले.

त्यानंतर देशमुख यांनी दुकानात जाऊन बघितले असता दुकानातून 35 हजार रुपयांची रोख रक्कम, चार हजारांचे चॉकलेट, डियो, परफ्युम, हेअर ऑइल असा एकूण 39 हजार रुपयांचा माल चोरून नेला.

एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.