Moshi : मार्चमध्ये हिसकावलेल्या मोबईलची ऑक्टोबरमध्ये तक्रार

एमपीसी न्यूज – मार्च महिन्यात मोबईल फोनवर बोलत रस्त्याने जाणा-या एका व्यक्तीचा मोबईल फोन दोन चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून नेला. या घटनेची तक्रार ऑक्टोबर महिन्यात नोंदवण्यात आली आहे. कोरोना साथ सुरु असल्याने तक्रार नोंदवण्यास आलो नव्हतो, असे तक्रारदाराने सांगितले.

नितीन संभाजी सोळसे (वय 31, रा. मोशी) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दोन अनोळखी चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 5 मार्च 2020 रोजी फिर्यादी सोळसे नाईट ड्युटीसाठी नोकरीवर जात होते. सोसायटीच्या गेट समोर आल्यानंतर त्यांना त्यांच्या पिक अप करणा-या गाडीच्या चालकाचा फोन आला. त्यामुळे ते चालकासोबत फोनवर बोलत होते.त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या हातातील 10 हजारांचा मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून नेला.

फिर्यादी सोळसे यांना कामाचा लोड असल्याने तसेच कोरोनाची साथ आल्याने त्यांनी सात महिन्यानंतर याबाबत गुन्हा नोंदवला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.