Moshi : चाकूचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग

एमपीसी न्यूज – लग्नाची मागणी घालत चाकूचा धाक दाखवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. ही घटना तापकीरनगर मोशी येथे सोमवारी (दि. 24) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली.

याप्रकरणी 16 वर्षीय मुलीने एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अक्षय डोईफोडे (वय 19) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीच्या घरी जाऊन आरोपीने ‘मला तू खूप आवडतेस, तू माझ्याशी लग्न कर’ असे म्हणत लग्नाची मागणी घातली. त्यास मुलीने नकार दिला. त्यानंतर आरोपीने मुलीला चाकूचा धाक दाखवून ठार मारण्याची धमकी दिली. तसेच तिच्याशी अश्लील वर्तन केले. यावरून घाबरलेल्या तरुणीने तात्काळ एमआयडीसी भोसरी पोलिसात धाव घेतली. आरोपीला अद्याप अटक केली नसून महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक तोडकर तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.