BNR-HDR-TOP-Mobile

Moshi : विवाहितेचा विनयभंग, पतीला मारहाण, आरोपी पसार 

187
PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – ‘तु मला आवडतेस, माझे तुझ्यावर प्रेम आहे. तु माझ्याशी लग्न करशील का’ असे म्हणत तरूणाने विवाहितेचा विनयभंग केला. तसेच तिच्या पतीला शिवीगाळ करत मारहाण केली. हा प्रकार भोसरीतील भारत माता चौकात शुक्रवारी (दि.11) रोजी घडला.

विकास अशोक तौर (वय-25, रा. शास्त्री चौक, भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी 22 वर्षीय विवाहितेने भोसरी, एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरूण आणि फिर्यादी महिले पूर्वी एकाच ठिकाणी नोकरीला होते. आरोपी फिर्यादीला वारंवार त्रास देत होता. तसेच ‘तु मला आवडतेस, माझे तुझ्यावर प्रेम आहे. तु माझ्याशी लग्न करशील का’ असे म्हणत आरोपीने विवाहितेचा विनयभंग केला. तिच्या पतीला शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. वारंवार होणा-या त्रासाला कंटाळून विवाहितेने पोलीस ठाण्यात धाव घेत तरूणावर गुन्हा दाखल केला.सहायक पोलीस निरीक्षक शिंदे तपास करत आहेत.

.

HB_POST_END_FTR-A1
HB_POST_END_FTR-A3