Moshi : उंदीर मारण्याचे औषध पिऊन तरुणाची आत्महत्या

एमपीसी न्यूज – राहत्या घरात विष प्राशन करून तरुणाने आत्महत्या केली. ही घटना मोशी येथे घडली.

विनोद ज्ञानेश्‍वर पाटील (वय 21, रा. तुपे वस्ती, मोशी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 फेब्रुवारी रोजी पहाटे पाच वाजताच्या सुमारास विनोद यांनी राहत्या घरात उंदीर मारण्याचे औषध प्राशन केले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र बुधवारी (दि . 20) पहाटे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.