Moshi News : मोशीतील आंतरराष्ट्रीय खुल्या प्रदर्शन केंद्राचे 95 टक्के काम पूर्ण

completed

एमपीसी न्यूज – मोशीत उभारण्यात येत असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खुल्या प्रदर्शन केंद्राचे 95 टक्के काम पूर्ण झाले आहे. लकरच हे केंद्र प्रदर्शनासाठी खुले होणार आहे. देश विदेशातील उद्योगांकडूंन तयार करण्यात येत असलेल्या उत्पादनाच्या विपणनासाठी व्यासपीठ मिळावे यासाठी पिंपरी-चिंचवड नवनगरविकास प्राधिकरणाकडून हे काम करण्यात येत आहे.

प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बन्शी गवळी यांनी याबाबत माहिती देताना असे सांगितले की, खुल्या प्रदर्शन केंद्राचे 95 टक्के काम पूर्ण झाले असून, फक्त फिनिशिंग आणि कलर आदी बाबी राहिल्या आहेत.

_MPC_DIR_MPU_II

हि कामेसुद्धा थोड्याच दिवसात पूर्ण केली जातील व लवकरच प्रदर्शन केंद्र खुलं करण्यात येईल. सध्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रदर्शन भरविण्यास परवानगी नाही. मात्र, पालिकेच्या वतीने केंद्रासाठी ऑपरेटर नेमण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे गवळी म्हणाले.

देश विदेशातील उद्योगांकडून निर्माण केल्या जाणा-या उत्पादन यासाठी एक व्यासपीठ मिळावे म्हणून, मोशी परिसरात 20 हेक्टर जागेत आंतरराष्ट्रीय दर्जाच्या खुल्या प्रदर्शन केंद्राची उभारणी करण्यात येत आहे. खुल्या प्रदर्शन केंद्रात अंतर्गत रस्ते, स्वच्छता गृह आदी सुविधा उभारण्यात आल्या आहेत. परिसर आकर्षक करण्यासाठी या भागात वृक्षारोपण देखील करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड शहर हे औद्योगिकनगरी म्हणून ओळखली जाते. मोशीतील आंतराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राचा या उद्योगांना मोठा फायदा होईल. कोरोना संसर्ग आटोक्यात आल्यानंतर याठिकाणी आंतराष्ट्रीय दर्जाचे प्रदर्शन भरवता येणार आहेत, असेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like