Moshi News : त्रिवृक्षसंगम दत्तमंदिराच्या वतीने महिलांचा भव्य स्नेहमेळावा उत्साहात संपन्न

एमपीसी न्यूज – त्रिवृक्षसंगम दत्तमंदिराच्या वतीने मोशी प्राधिकरण परिसरातील (Moshi News) महिलांसाठी बुधवारी भव्य महिला स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी 3 ते सांयकाळी 7 या कालावधीत हा स्नेहमेळावा पार पडला. यामध्ये वक्तृत्व स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, लघुनाटिका, मोफत आरोग्य तपासणी, महाआरती अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीच्या माजी सभापती सीमा सावळे, माजी नगरसेविका नम्रता लोंढे, वनिता आल्हाट, भोसरी-चऱ्होली महिला मोर्चा अध्यक्ष गीता महेंद्रू, सामाजिक कार्यकर्त्या पूजा बोऱ्हाडे, उद्योजिका राजश्री गागरे, शालेय शिक्षण अधिकारी नीता खाडे, मुख्याध्यापिका विजया चौगुले तसेच त्रिवृक्षसंगम दत्तसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश कर्डिले, सचिव दीपक नाईक यांची प्रमुख उपस्थिती होती.

Kasrwadi News : दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या स्मरणार्थ रुग्णवाहिकेचे लोकार्पण

राष्ट्रगीताने स्नेहमेळाव्याचा प्रारंभ करून शिवगर्जना घेण्यात आली. ‘आधुनिक नारी’ या विषयावरील वक्तृत्व स्पर्धेत नारीशक्तीचे रूपांतर उद्योगशक्तीत करून महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावे, असे विचार सहभागी महिलांनी व्यक्त केले. सुमारे दोनशेहून अधिक महिलांची उपस्थिती, विविध स्पर्धा अन् सांस्कृतिक कार्यक्रमातील आत्मविश्वासपूर्ण (Moshi News) सहभाग, चांगले नियोजन यामुळे संपूर्ण स्नेहमेळावा यशस्वी झाला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.