Moshi News : मोशी कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात मास्क न वापरणा-या 15 जणांवर कारवाई

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरातील वाढता कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. मोशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात आज (रविवारी, दि. 21) सकाळी क क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागाच्या पथकाने केलेल्या पाहणीत 15 नागरिकांनी मास्क न वापरल्याचे निदर्शनास आले. याबाबत संबंधित नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

नागरिकांनी मास्कचा वापर करावा, रस्त्यावर थुंकू नये, असे आवाहन आयुक्त राजेश पाटील यांनी केले होते. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त अजित पवार यांनी शनिवारी (दि. 20) सर्व क्षेत्रीय अधिकारी व वैद्यकिय अधिकारी यांची बैठक घेतली. बैठकीत शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणा-या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. तसेच वैद्यकिय अधिकारी डॅा. अनिल रॅाय यांनीही तशा सूचना आरोग्य विभागास दिल्या होत्या.

रविवारी मोशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात सहाय्यक आयुक्त तथा क्षेत्रीय अधिकारी अण्णा बोदडे यांच्यासह मुख्य आरोग्य निरीक्षक विजय दवाळे, आरोग्य निरीक्षक सचिन जाधव, वैभव कांचनगौडार, राजेश चटोले यांच्या पथकाने भोसरी एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांसह तपासणी केली. तसेच नागरिकांचे प्रबोधन केले.

यावेळी 15 नागरिक मास्क वापरत नसल्याचे आढळून आले. मास्कचा वापर न करणाऱ्या 15 नागरिकांवर प्रत्येकी 500 रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.